Monday, February 20, 2012

sanjivani

कुंडीतील वाळलेल्या  खोडाला  ,                                                                            
  सहजच ,अगदी सहजच  टाकले होते मी पाणी ,
हळूच पालवी फुटून त्याने दिली
मला  जगण्याची संजीवनी ..

Thursday, February 16, 2012

कोणीच कोणाचं नसतं
इथे प्रत्येक जण आपली सोय पहात असत
स्वतातला 'स्व ' जपायचा असतो म्हणूनच मायेच्या मोहजालात 
स्वताला गुर्फ्ह्ठून  तो घेत असतो ...प्रत्येकजण सोय पाहत असतो
 
क्षणभराच्या सुखासाठी ढीगभर दुखाला सामोरे तो जात असतो
चेहऱ्यावर हसरा मुखवटा तो चढवत असतो
इथे प्रत्येकजण आपली सोय पाहत असतो'

नियती -नशीब यांना दुषणे देत चालत राहतो
सर काही मिळूनही अश्रू तो गालात असतो
प्रत्येकजण आपली सोय पाहत असतो

सुख म्हणजे काय ? हे त्याला कळलेलंच नसतं अद्यानाच्या अ;धकारातच तो
गिरक्या घेत फिरत राहतो
इथे प्रत्येकजन आपली सोय पाहत असतो
सोय पाहत असतो